S M L

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2013 11:04 PM IST

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

 31 डिसेंबर : गेल्या चार वर्षांपासून राज्य महिला आयोग अध्यक्षाविनाच होतं अखेर या वर्षांच्या शेवटच्या दिवशी आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. ऍड. सुशीबेन शाह या महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष असणार आहेत. तब्बल चार वर्षांनंतर महिला आयोगाला अध्यक्ष लाभल्यात. सुशीबेन शाह या सध्या मुंबई महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत.

त्या स्त्रीशक्ती नावाची संघटना चालवतात. सुशीबेन या मुरली देवरा गटाच्या मानल्या जातात. त्यांच्या नावासाठी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा आणि खासदार रजनीताई पाटील यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केलं. त्यांच्याबरोबरच सहा सदस्यांचीही घोषणा करण्यात आली.

सोमवारी राज्य महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष निवडीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत होती. त्यामध्ये मुंबईच्या ऍड. सुशीबेन शाह यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्याशिवाय चंद्रपूरच्या ऍड.विजया बांगडे, जळगावच्या ललिता पाटील, कोल्हापूरच्या सरला पाटील यांच्याही नावावर विचारही करण्यात आला. मात्र अखेर हायकमांडने सुशीबेन शाह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

कोण आहेत ऍड. सुशीबेन शाह ?

- मुंबईचे माजी मंत्री बी. ए. देसाई यांची मुलगी

- मुंबई काँग्रेसच्या पदाधिकारी

- केवळ महिला चालक असलेल्या प्रियदर्शनी टॅक्सी कंपनीच्या संचालिका

-अखिल भारतीय घरेलू कामगार युनियनच्या चेअरमन

राज्य महिला आयोगाच्या सदस्य कोणकोण आहेत ?

1. सुशीबेन शाह, मुंबई, अध्यक्ष

2. चित्रा वाघ, मुंबई, सदस्य

3. आशा मिरगे, अकोला, सदस्य

4. आशा भिसे, लातूर, सदस्य

5. ज्योत्स्ना विसपुते, जळगाव, सदस्य

6. विजया बांगडे, चंद्रपूर, सदस्य

7. उषा कांबळे, उदगीर, सदस्य

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2013 08:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close