S M L

न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनचा विश्वविक्रम

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2014 03:09 PM IST

न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनचा विश्वविक्रम

  1 जानेवारी : न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने वन डे क्रिकेट सामन्यात सगळ्यात वेगवान सेंच्युरीचा शाहिद आफ्रिदीचा 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी मोडून काढला आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करत त्याने अवघ्या 36 बॉल्समध्ये ही सेंच्युरी पूर्ण करून नव्या वर्षाचं धमाकेदार स्वागत केले आहे .

वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना त्याने 36 बॉल्स मध्ये 101 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेतला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्यानं 37 बॉलमध्ये श्रीलंकेविरोधात सेंच्युरी केली होती. वन डे सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकणार्‍यांच्या यादीत भारताचा विराट कोहली आठव्या क्रमांकावर आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 बॉल मध्ये शतक पूर्ण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2014 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close