S M L

माळशेज घाटात एसटी कोसळली, 27 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2014 10:07 PM IST

माळशेज घाटात एसटी कोसळली, 27 ठार

bus accident02 जानेवारी :  कल्याणहून अहमदनगरकडे जाणारी एसटी बस माळशेज घाटात 40 फूट खोल दरीत कोसळलीय. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. यात 18 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कल्याण-नगर मार्गावर हा अपघात झालाय.

माळशेज घाटात एसटी बस ट्रकवर आदळल्यानं 40 फूट खोल दरीत ही बस कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की एसटीचे 2 तुकडे झाले. जखमी प्रवाशांना जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आणि आळेफाटा येथे ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी 10 च्या सुमारास ही बस विठ्ठलवाडी आगारतून अहमदनगरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या बसमध्ये 42 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. एसटीला ट्रकची धडक बसल्यानं बस माळशेज घाटातल्या दरीत कोसळली. बस खोल दरीत कोसळल्यानं बचाव कार्यात अडथळे आले. मात्र पोलीस, स्थानिक नागरिक आणि जुन्नरच्या सह्रयाद्री गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांना मदत केरत बचाव कार्याला मदत केली.

आत्तापर्यंत माळशेज घाटात घडलेला एसटीचा सगळ्यात मोठा अपघात असल्याचं, एसटीच्या पुणे विभागीय नियंत्रकांनी सांगितलं. सरकारनंही अपघातग्रस्तांना मदत जाहीर केलीय. अपघात घडताच जुन्नर, ओतूर आणि मुरबाड इथल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केलं. अवघ्या तीन तासात कपड्याची झोळी करुन दोरखंडाच्या सहाय्यानं मृतदेह वर काढले. या अपघातातील जखमींवर आळेफाटा इथल्या सोनावणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नुकतंच सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावावर लाखो रुपये खर्च केले. मात्र रस्ता आहे तेवढाच आहे. गेल्या चार महिन्यातली ही दुसरी दुदैर्वी घटना आहे.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना एस.टी.तर्फे 3 लाख तर राज्य सरकारतर्फे 2 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. माळशेज घाट दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2014 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close