S M L

न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय टीम सज्ज

20 फेब्रुवारी, न्यूझीलंड टी-20, वन-डे आणि टेस्ट सिरीज खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोणीची टीम इंडिया न्यूझीलंडला पोहचलीये. सहा आठवड्यांच्या या दौर्‍यात भारतीय टीम दोन टी-20 मॅच, पाच वन-डे आणि तीन टेस्ट मॅच खेळणार आहेत. याआधी 2003मध्ये भारताने न्यूझीलंड दौरा केला होता. त्यात भारताला टेस्टमध्ये 2-0 तर सात वन-डेमध्ये 5-2 असा पराभव पत्करावा लागला होता. पण न्यूझीलंडमधला 20 फेब्रुवारी हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण याच दिवशी भारताने उपखंडाच्या बाहेर न्यूझीलंडमध्ये पहिला टेस्ट विजय मिळवला होता. नवाब पतौडी यांच्या नेतृत्वाखाली 20 फेब्रुवारी 1968 साली भारताने न्युझीलंडचा पाच विकेटने पराभव केला होता. या विजयात अजित वाडेकर यांनी पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या 80 रन्स तर दुसर्‍या इनिंगमध्ये केलेल्या 71 रन्सचा महत्त्वाचा वाटा होता. भारताने ही सिरीज 3-1ने जिंकली होती. बरोबर 41 वर्षांपूर्वी भारताने मिळवलेला हा विजय धोणीच्या टीम इंडियासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. भारतासाठी हा क्रिकेट हंगाम जबरदस्त यश देऊन गेला.भारतीय टीमने आधी जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन टीमला टेस्ट सीरिजमध्ये दोन शून्यने धूळ चारली. इंग्लंड विरुद्धची वन डे सीरिजही पाच - एकनं जिंकली. तर टेस्ट सीरिजमध्ये मिळवलेल्या विजयामुळे वर्षाचा शेवटही गोड झाला. पण नव्या वर्वात भारतीय टीमसमोर आव्हान आहे ते न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानात हरवण्याचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2009 05:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2009 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close