S M L

मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

21 फेब्रुवारी मुंबईमंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नव्यानं समाविष्ट करून घेतलेल्या तिघा मंत्र्यांचं खातेवाटप रात्री उशिरा जाहीर केलं नारायण राणे यांना उद्योग खात्यावर समाधान मानावं लागणार आहे.याचबरोबर राणेंना बंदरे आणि खारजमीन खात्याचा भारही वाहावा लागणार आहे. खातेवाटपातही त्यांना नाराजी स्वीकारावी लागल्याचं दिसतंय. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र दोन खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यांना शालेय शिक्षण आणि विधी व न्याय विभागही सोपवण्यात आलाय. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नसीम खान यांना शहरी विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. नारायण राणे महसूल आणि नगर विकास खात्यासाठी अडून बसल्याची चर्चा होती. पण महसूल खातं सध्या पतंगराव कदम यांच्याकडं असल्यानं त्यांना दुखवून नारायण राणे यांच्याकडे पुन्हा महसूल खातं देणं पक्षासाठी कठीण होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2009 04:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2009 04:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close