S M L

दाऊदला लवकरच भारतात आणणार -शिंदे

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2014 11:17 PM IST

sushilkumar shinde08 जानेवारी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळून लवकरच भारतात आणणार असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. दाऊदला आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एफबीआयच्या संपर्कात असल्याची माहितीही शिंदे यांनी दिलीय. सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

या अगोदरही शिंदे यांनी दाऊदला भारतात आणण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब आणि संसदेवर हल्ल्यातील अतिरेकी अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आलं होतं.

त्यानंतर काही दिवसातच अब्दुल टुंडा, यासीन भटकळ सारख्या खतरनाक दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात गृहखात्याला यश आलं होतं. या यशानंतर शिंदे यांनी आता दाऊदचा नंबर असं विश्वासनं सांगितलं होतं. त्यामुळे शिंदे यांनी पुन्हा एकदा दाऊदच्या अटकेबद्दल विश्वास व्यक्त करुन दाऊदची 'ब्रेकिंग न्यूज' मिळण्याचे संकेत दिलेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2014 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close