S M L

कोल्हापुरात टोल आंदोलन, 2 उपोषणकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2014 04:13 PM IST

कोल्हापुरात टोल आंदोलन, 2 उपोषणकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल

235kol toll3409 जानेवारी : कोल्हापुरात टोल नाक्याच्याविरोधात उपोषणाला बसलेल्या 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. जयदीप शेळके आणि उदय लाड अशी या दोघांची नावं आहेत. शहरात सुरू असलेल्या टोलला विरोध करण्यासाठी टोल विरोधी कृती समितीचे सदस्य महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करत आहेत. आज या उपोषणाचा 4 था दिवस आहे.

तब्येत खालावलेल्या कार्यकर्त्यांना शहरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे टोलविरोधी कृती समितीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा टोलविरोधातला संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. बुधवारी मुंबईमध्ये टोलप्रश्नी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कृती समिती आज पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहे.

दरम्यान, आयआरबी कंपनीनं गेल्या 2 महिन्यांमध्ये 99 लाखांची कमाई केल्याची माहिती कृती समितीनं दिलीय. त्यामुळे जनतेची सुरू असलेली ही लूट त्वरीत थांबवावी असं कृती समितीचं म्हणणं आहे. या आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळत असून अनेक राजकीय पक्षांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2014 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close