S M L

राज ठाकरे लागले कामाला, भाजपचा बहिष्कार !

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2014 03:42 PM IST

raj on rr patil new11 जानेवारी : महाराष्ट्राची 'ब्लु प्रिंट' तयार करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऐन निवडणुकांच्या तोंडावर अपेक्षेप्रमाणे कामाला लागले आहे. आज त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकासकामांचं भूमिपूजन होतंय. मात्र मनसेचे महापालिकेच्या सत्तेतले मित्र भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

भाजपच्या नेत्यांना का कार्यक्रमांतून डावलणं आणि नरेंद्र मोदींवर केलेली टीका यामुळे भाजप-मनसेत तेढ निर्माण झालीय. साडे चारशे कोटी रुपयांचे रस्ते-पूल या कामांचे यावेळी भूमिपूजन होतंय.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं नाशिकमधीलं कामकाज ही महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे. म्हणूनच की काय मनसेचे नाशिकमधील अघोषित उमेदवार डॉ.प्रदीप पवारांना सोबत घेऊनच राज ठाकरेंनी हे सर्व भूमिपूजनाचे कार्यक्रम केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2014 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close