S M L

'सावकारीला लगाम घालण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणार'

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2014 04:41 PM IST

Image img_223652_harshvardhanpatil_240x180.jpg11 जानेवारी : बेकायदा सावकारीगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याचं सहकार आणि गृह खातं एकत्रितपणे योजना राबवणार असल्याची घोषणा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयबीएन-लोकमतच्या आजचा सवाल या कार्यक्रमात केली.

सावकारीविरोधातल्या तक्रारींसाठी जिल्हा, विभाग आणि कमिशनर आणि सचिव पातळीवर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शुक्रवारी महाराष्ट्र सावकारीविरोधी कायद्याला केंद्राने मंजुरी दिलीय.

महाराष्ट्र सावकारी विरोधी विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केलीय. त्यामुळे आता गोरगरिबांची पिळवणूक करणार्‍या सावकारांना चाप बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2014 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close