S M L

नागपूर विमानतळ सोहळ्यात नितीन राऊत अनुपस्थित ?

22 फेब्रुवारी , नागपूरप्रशांत कोरटकरनागपूर विमानतळ हस्तांतरणाचा सोहळा पार पाडला. अखेर हे विमानतळ राज्यसरकारला हत्तांतरीत करण्यात आलं. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, शरद पवार, विलास मुत्तेमवार, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पण गृहराज्यमंत्री नितीन राऊत मात्र या सोहळ्याला अनुपस्थित होते. त्यामुळे नितीन राऊत अजुनही नाराज असल्याची चर्चा होती.गृहराज्य मंत्री नितीन राऊत सरकारवर नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आपल्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल अशी, त्यांची आशा होती. पण ते न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे. तसंच त्यांच्याकडे असलेल्या गृहराज्यमंत्री पदाचेसुद्धा शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले. त्यातील मुंबईसहीत शहरी भाग वेगळा काढण्यात आला. तो नसीम खान यांना देण्यात आलाय. त्यामुळं राऊत दुखावले आहेत. त्यांनी आपली लालदिव्याची गाडी परत पाठवली असं त्यांचे समर्थक सांगत आहेत. राऊत यांच्या समर्थकांनी पत्रकारांना फोन करून राऊत यांनी राजीनामा दिला अशी माहीती दिली. मात्र अमरावतीच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2009 08:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2009 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close