S M L

बारामतीकरांची रिंगरोडच्या नावावर टोल लूट

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2014 06:15 PM IST

Image img_239222_kolhapurtoll_240x180.jpg 14 जानेवारी : बारामती शहरात रिंगरोडच्या नावावर गेल्या 8 वर्षांपासून टोलवसुली केली जातेय. बारामती नगरपरिषदेने रिंगरोड करणार्‍या ठेकेदारास तारण म्हणून बारामती शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेली आणि सुमारे 125 कोटी रुपये किमतींची जागा तब्बल 99 वर्षांच्या करारावर दिली आहे. महत्वाचे म्हणजे बारामतीमध्ये पाच टोल नाके आहेत. इथे स्थानिक पुढार्‍यांकडून टोल घेतला जात नाही पण सामान्यांची मात्र टोलच्या माध्यमातून लूट होतेय.

शहरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अशा दोन्ही वेळी टोल हा द्यावाच लागतो. बारामती ते पाटस, नीरा, मोरगाव,इंदापूर,भिगवण या पाच रस्त्यांवर टोलनाके उभारण्यात आले आहेत. बारामती शहराच्या बाहेरून साधारण साडेचार किमी लांबीचे पूरक रस्ते,चौकाची सुधारणा या कामाच्या बदल्यात 19 वर्ष म्हणजेच 2030 सालापर्यंत टोलवसूल केला जाणार आहे.

मात्र बारामती नगरपरिषदेने हे रिंगरोड आणि चौकाची सुधारणा करणार्‍या ठेकेदारास महत्वाच्या ठिकाणी असलेली तब्बल 21 एकर जागा 99 वर्षांसाठी तारण म्हणून दिली आहे. तर दुसरीकडे 2005 सालच्या वाहनाच्या संख्येच्या आधारावर इथे टोलची आकारणी करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर आजपर्यंत वाहनाची संख्या दुप्पट झाली आहे. तरीदेखील टोलची मुदत कमी केली जात नाही. याशिवाय प्रत्येक वाहनाकडून घेतली जाणारी टोलची रक्कमही कमी केली जात नाही. ही टोलवसुली म्हणजे सामान्य जनतेवर टाकलेली टोल धाड आहे असा आरोप नागरिक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2014 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close