S M L

जळगाव बँक घोटाळा : देवकरांवर होणार गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2014 08:14 PM IST

Image img_203152_gulabraodevkar_240x180.jpg14 जानेवारी : घरकुल घोटाळ्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री गुलाबराव देवकर जळगाव जिल्हा बँक घोटाळ्यातही अडकले आहेत. दोन कोटी 14 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुलाबराव देवकरांविरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे.

देवकरांसह माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल होईल. शिवाय जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल होईल. जळगावच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी जिल्हा पेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा बँकेत संगणकीकरण करण्याचे आश्वासन देऊन दोन कोटी 14 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय. नेलिटो सिस्टिम्स या कंपनीविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2014 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close