S M L

महात्मा गांधींजींच्या खाजगी वस्तूंचा अमेरिकेत लिलाव

22 फेब्रुवारीमहात्मा गांधींजी यांच्या पाच खाजगी वस्तूंचा अमेरिकेत लिलाव होणार आहे. या लिलावात भाग घेण्याचा निर्णय गांधींजींचे नातू तुषार गांधी यांनी घेतलाय. अमेरिकेत न्यूयार्क इथल्या अन्टीकोरम ऑक्शनरीजमध्ये 5 आणि 6 मार्चला हा लिलाव होणार आहे. लिलाव होणा-या वस्तूंमध्ये गांधीजींचा प्रसिद्ध असा चष्मा, चप्पल, घड्याळ, थाळी आणि वाटी यांचा समावेश आहे. या वस्तूंच्या लिलावाला भारतात अनेकांनी विरोध केलाय. पण, हा लिलाव रद्द होण्याची कुठलीच शक्यता नाही. त्यामुळेच अखेर महात्मा गांधी फाउंडेशनतर्फे तुषार गांधी या लिलावात सहभागी होणार आहेत. त्यासाठी पुढच्या सात दिवसात त्यांना दीड कोटी रुपये जमवायचे आहेत. आत्ता त्यांच्याकडे फक्त दीड लाख रुपये जमलेले आहेत. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन तुषार गांधी यांनी केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2009 05:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2009 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close