S M L

मुंबई विद्यापीठावर मनविसेचा झेंडा

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2014 07:57 PM IST

मुंबई विद्यापीठावर मनविसेचा झेंडा

mns universirty4515 जानेवारी : धमक्या,लाच आणि अपहरण या नाट्यामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलची निवडणूक अखेर पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने बाजी मारली आहे. मनविसे आणि एनएसयुआय दरम्यान झालेल्या चुरशीच्या लढतीत मनविसेला 9 मतं मिळवत बाजी मारली. तर एनएसयुआयला पाच मतं मिळाली. स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदी मनविसेच्या रेश्मा पाटील यांची निवड झालीय.

अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत मनविसेकडून अध्यक्षपदासाठी रेश्मा पाटील, सचिवपदासाठी पियुष झेंडे तर एनएसयुआयतर्फे अध्यक्षपदासाठी स्वामी नंदिनी आणि सचिवपदासाठी प्रणव भट यांच्यात चुरस होती. या उत्कंठावर्धक निवडणुकीत एकूण 14 कॉलेजचे जीएस मतदार होते. त्यापैकी 3 जीएसनी बहिष्कार टाकला. तर एक जीएस तटस्थ राहणार असल्याच जाहीर केलं होतं.

त्यामुळे बाकी 10 मतदारांपैकी मनविसे आणि एनएसयुआय यांच्याकडे प्रत्येकी 5 जीएस आहेत. त्यामुळे मताधिक्य मिळवून कोण विजयी होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. ऐन निवडणुकीच्या वेळी मनविसेच्या पारड्यात नऊ मत पडली आणि बाजी मारली. मनविसेने विजयानंतर विद्यापीठ परिसरात एकच जल्लोष केला. विद्यापीठाच्या गेटवर विद्यार्थ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यानंतर मनविसेच्या नव्या अध्यक्षा रेश्मा पाटील आणि सचिव पियुष झेंडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कुष्णकुंजवर रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2014 07:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close