S M L

प्रतीक्षा ऑस्करची

22 फेब्रुवारीऑस्कर सोहळ्याची उत्सुकता आता वाढत चालली आहे. कोडॅक थिएटरमध्ये होणा-या या दिमाखदार सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण या सोहळयाआधी तिथे प्री-ऑस्कर पाटर्याही रंगल्या आहेत. ए.आर.रहमानला ऑस्करमध्ये तीन नॉमिनेशन्स मिळाल्यामुळे भारतातील प्रत्येकजण वाट बघतोय ती ऑस्कर सोहळ्याची. रहमान ऑस्कर मिळवणारा पहिला भारतीय संगीतकार ठरू शकतो. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट गाणं या कॅटगरीत फक्त तीन गाणी आहेत. त्यात स्लमडॉग मिलेनियर सिनेमातीलच दोन गाणी आहेत. त्यात पहिलं गाणं आहे रहमानला गोल्डन ग्लोब मिळवून देणारं 'जय हो' हे गाणं. गीतकार गुलजार यांना सुद्धा याच गाण्यासाठी ऑस्करचं नॉमिनेशन मिळालंय. याच कॅटगरीत दुसरं गाणंही रहमानच्या जादुई संगीताने तयार झालेलं आहे. या गाण्याचे बोल आहेत 'ओ साया' महत्त्वाचं म्हणजे रहमाननं हे गाणं आपली सहकारी माया अरूलप्रगलस्सम यांच्याबरोबर लिहलंसुद्धा आहे. आणि यासाठीही मायाबरोबर रेहमानला नॉमिनेशन मिळालं आहे.रहमानच्या या दोन गाण्यांबरोबर हॉलिवुडच्या 'वॉल ई'या सिनेमातलं 'डाऊन टू अर्थ' हे गाणं आहे. या गाण्याला संगीत दिलंय पीटर गॅब्रियल आणि थॉमस न्यूमन यांनी. ऑस्करवीर बनण्याची नामी संधी रहमानला चालून आलीय. या कॅटगरीत रहमानचीचं दोन गाणी असल्यामुळे ऑस्कर अभी दूर नही असं म्हणायला हरकत नाही. स्लमडॉग मिलेनियरमध्ये रहमान आणि गुलजार यांच्याबरोबरच साऊंड मिक्सिंगसाठी रेसुल पुक्कुटी यांनाही ऑस्करच नॉमिनेशन मिळालंय.स्लमडॉग मिलेनियरला किती ऑस्क र मिळणार याबद्दल तर सगळयांनाच उत्सुकता आहेच. डॅनी बोएल यांचं दिग्दर्शन असणा-या या सिनेमाला तगडी स्पर्धा आहे ती 'द क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन'ची. या सिनेमाला तब्बल 13 नॉमिनेशन्स मिळाली आहेत. यानंतर आहे 'मिल्क' या सिनेमाला आठ नॉमिनेशन्स मिळाली आहेत.याशिवाय फ्रॉस्ट निक्सन या सिनेमाला मिळाली आहेत 5 ऑस्कर नॉमिनेशन्स तर द रीडरला 4 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2009 06:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2009 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close