S M L

ठाकरेंकडे इतकी संपत्ती आली कुठून ?-जाधव

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2014 07:54 PM IST

ठाकरेंकडे इतकी संपत्ती आली कुठून ?-जाधव

235 bhaskar20 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुटुंबीयांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू झालाय. मात्र या वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेबांकडे इतकी संपत्ती आली कुठून हे आधी त्यांनी जाहीर करावं, मगच हा वाद कोर्टात का गेला याचं स्पष्टीकरण होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिली.

जाधव एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणतात, ठाकरे कुटुंबीयांचा कुठे एखादा कारखाना आहे हे मी पाहिलं नाही, त्यांचा कुठे व्यवसाय आहे हेही मी पाहिलं नाही, ते सतत म्हणायचे पवारांना शेत करता येत नाही तर यांच्याकडे कुठे शेतीही नाही. उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीचा छंद आहे पण त्यांचा कुठे फोटो स्टुडिओ दिसत नाही. मग एवढं सगळं नसताना ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून अशी खोचक टीका जाधव यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांनाच संपत्ती मानत होते, असंही जाधव म्हणाले. बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात प्रोबिट याचिका दाखल केली आहे तर या याचिकेला जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही असा जयदेव यांचा आक्षेप आहे तर मृत्युपत्रात संपत्तीबाबतच्या अनेक गोष्टींचा समावेश नाही असा आक्षेपही जयदेव यांनी घेतलाय. ठाकरे कुटुंबीयांचा वाद चव्हाट्यावर आलाय यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2014 07:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close