S M L

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनकडे सरकारचे दुर्लक्ष

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2014 10:17 PM IST

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनकडे सरकारचे दुर्लक्ष

363346 anganwadi 421 जानेवारी : राज्यातील तब्बल 3 लाख अंगणवाडी सेविकांचं कामबंद आंदोलन सुरुच आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आतापर्यंत राज्य सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्यात.

राज्यभरात अंगणवाडी सेविकांची निदर्शनं सुरू आहेत. अंगणवाडी सेविकांना मानधन नको, तर वेतन द्यावं, तसंच निवृत्तीनंतर एकरकमी लाभ द्यावा अशा त्यांच्या मागण्या आहेत.

पण त्याकडे दुर्लक्षच केलं जातंय. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये संतप्त भावना आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2014 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close