S M L

गणेश दुधगावकरांचं प्रगतीपुस्तक

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2014 09:13 PM IST

गणेश दुधगावकरांचं प्रगतीपुस्तक

21 जानेवारी : परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं बातमीचा विषय ठरले ते परभणीचे शिवसेनेचे खासदार ऍड. गणेश दुधगावकर. पहिल्यांदा काँग्रेसचे मंत्री असलेले दुधगावकर 2004 मध्ये शिवसेनेत आले, आमदार झाले, खासदार झाले आणि सध्या शिवसेनेतच परके बनलेत. कारण, अर्थातच राष्ट्रवादीसोबतचा घरोबा. पण सध्या त्यांची परिस्थिती ना शिवसेनेचे ना राष्ट्रवादीचे अशी झाली आहे. स्वत:चा पक्ष सोडा, मतदार संघातल्या लोकांनाही ते कधी दिसलेच नाहीत. अर्थात लोकसभेत 100 टक्के हजेरी हे त्यांच्या कारकीर्दीचं एकमेव वैशिष्ट्य. आणि याच्याच जोरावर त्यांना वाटतंय, आपण पुन्हा परभणीचे खासदार होऊ...

संसदेत सर्वाधिक हजेरी असली तरी मतदारसंघातील गैरहजेरी हा दुधगावकरांवरच्या टीकेचा मुद्दा. मतदार संघ काय, ते त्यांना तर त्यांच्या पक्षातही मान नाही अशी टीका त्यांचे विरोधक करत आहेत.

खासदार निधीचे प्रगतीपुस्तक

  • * खासदाराचे नाव - गणेश दुधगावकर
  • * मतदारसंघाचे नाव - परभणी लोकसभा मतदारसंघ
  • * उपलब्ध निधी - 19 कोटी रुपये
  • * मंजूर निधी - 16 कोटी रुपये
  • * खर्च केलेला निधी - 12 कोटी रुपये
  • * खासदार निधीचा एकूण वापर - 73 %

सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या

  • * स्वतंत्रपणे: 7
  • * संयुक्तपणे: 13
  • * एकूण: 20

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2014 09:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close