S M L

भारताचा पुन्हा पराभव, अव्वल स्थानही गमावले

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2014 07:22 PM IST

भारताचा पुन्हा पराभव, अव्वल स्थानही गमावले

ind vs nz22 जानेवारी : भारतीय मैदानावर 'शेर' असलेली टीम इंडिया मात्र परदेशी मैदानावर 'ढेर' झालीय. हॅमिल्टनमध्ये दुसर्‍या वनडेतही टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसलाय. न्यूझीलंडनं भारताचा 15 रन्सनं पराभव केला. डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला विजयी घोषित करण्यात आलंय. या पराभवामुळे भारताला वन डे क्रमवारीत अव्वल स्थानही गमवावं लागलंय.

दुसर्‍या वनडेत पावसाने हजेरी लावल्यामुळे ही मॅच 42 ओव्हरची करण्यात आलीय. पहिली बॅटिंग करताना न्यूझीलंडनं न्यूझीलंडतर्फे केन विल्यमसन, रॉस टेलर आणि कोरी अँडरसननं तुफान फटकेबाजी करत टीम इंडियासमोर मोठे आव्हान उभे केले. न्यूझीलंडनं 42 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 271 रन्स केले. पण डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी 297 रन्सचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. याला उत्तर देताना भारताला 277 रन्सच करता आले.

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेले शिखर धवन आणि रोहित शर्मा या मॅचमध्येही झटपट आऊट झाले. पण यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारताची इनिंग सावरली. विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोणी वगळता टीम इंडियाच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीने 4 तर कोरी अँडरसनने 3 विकेट घेतल्या पण डकवर्थ ल्यूईस नियमानुसार टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडने 5 मॅचच्या या सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे तर वन डे क्रमवारीमध्ये टीम इंडियाला नंबर 1 चं स्थान गमवावं लागलं आहे. भारतीय टीम आता दुसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. पण जर टीम इंडियाने ही सीरिज जिंकली तर पुन्हा एकदा नंबर वन स्थान पटकावण्याची संधी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2014 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close