S M L

केजरीवाल येडा मुख्यमंत्री -शिंदे

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2014 11:28 PM IST

Image shinde_300x255.jpg21 जानेवारी : दिल्लीत आम आदमी पार्टीने केलेल्या आंदोलनावर टीकेची झोड उठतेय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तर आम आदमीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा थेट उल्लेख न करता 'वेडा मुख्यमंत्री' म्हणून खिल्ली उडवली आहे.

माझं लग्न झालं तेव्हा मुंबईत दंगल उसळली होती तेव्हा माझी सुट्टी रद्द झाली होती आणि हनीमूनला जाता आलं नाही. आता दिल्लीत तो वेड्या मुख्यमंत्री आंदोलनाला बसला होता त्यामुळे पोलिसांच्या सुट्‌ट्या रद्द कराव्या लागल्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनीही 'आप' नाही देशासाठी 'शाप' आहे, अशी टीका केली आहे. शिंदे यांनी केजरीवाल यांची वेडा म्हणून खिल्ली उडवल्यामुळे आपच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. सुशीलकुमार शिंदे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या सदस्या अंजली दमानिया यांनी केलीय. तसंच कालपर्यंत आमच्या भाषेबद्दल राजकीय पक्षांना आक्षेप होते, मग आता शिंदे यांच्या भाषेचं काय?, असा सवालही दमानिया यांनी विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2014 09:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close