S M L

वीज दरासाठी निरुपम यांचा आत्मदहनाचा इशारा

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2014 04:33 PM IST

वीज दरासाठी निरुपम यांचा आत्मदहनाचा इशारा

sanjay nirupam  fast25 जानेवारी : रिलायन्सनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आत्मदहन करू असा इशारा काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी दिलाय. वीजदर कमी करण्याच्या मागणीसाठी निरुपम मुंबईत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.

रिलायन्स पॉवर या वीज वितरक कंपनीनं वीजदर कमी करावेत, अशी त्यांची मागणी आहे. कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, वीजदर कमी करण्याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

विशेष म्हणजे दिल्ली प्रमाणे राज्यातही वीज दरात कपात व्हावी अशी मागणी निरुपम यांनी सुरुवातीला केली होती. राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यात 20 टक्के वीज दर कपात केलीय. मुंबईच्या वीजेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं. पण पक्षाला घरचा अहेर देत संजय निरुपम उपोषणाला बसले. निरुपम यांच्या उपोषणाची पक्षाकडून दखल तर घेतली जात नाही पण पाठराखणही होईना.

त्यामुळे विरोधकांनी तब्येतीची काळजी घ्या असं सांगत खिल्ली उडवलीय आता निरुपम यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. मात्र इथंही अजित पवारांनी बुधवारी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे निरुपम उपोषण मागे घेतात का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2014 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close