S M L

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंचं नाव निश्चित ?

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2014 09:26 PM IST

ramdas athavale on joshi25 जानेवारी : अखेर हो नाही म्हणत भाजपने आरपीआयचे नेते रामदास आठवलेंसाठी महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिलीय. बांद्रा- कुर्ला कॉम्पलेक्स मधील सोफिटेल हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडलीय.

या बैठकीत भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रामदास आठवलेंना देण्याचा निर्णय कळवण्यात आला. पण यावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्यानंतरच निर्णय जाहीर करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. तसंच लोकसभेची एकही जागा आरपीआयला भाजप सोडणार नाही असंही यावेळी सांगण्यात आलं. तर शिवसेना देखील आरपीआयला लोकसभेची केवळ एकच जागा सोडेल अशी भूमिका शिवसेनेने घेतली.

दरम्यान, मंगळवारी रामदास आठवले राज्यसभेचा अर्ज भरतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, खुद्द रामदास आठवले, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस ,सुभाष देसाई, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. राज्यसभेच्या राज्यातल्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2014 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close