S M L

विनावापर जमिनीसाठी शेतकर्‍यांचा एल्गार

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2014 09:02 PM IST

विनावापर जमिनीसाठी शेतकर्‍यांचा एल्गार

दिनेश केळुसकर,रत्नागिरी

25 जानेवारी : सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयासाठी 25 वर्षांपूर्वी अधिसुचित करण्यात आलेल्या शेकडो हेक्टर विनावापर जमिनीच्या सातबारावरची नोंद रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आसपासच्या तीन गावातले शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्हा प्राधिकरणाकडे अगोदरच संपादित जागेपैकी मोठ्या प्रमाणात जागा विनावापर असताना जास्तीची जागा संपादित करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतलाय.

चंदीगडसारखी नगरी इथे वसवली जाईल असं आश्वासन देऊन 25 वर्षांपूर्वी सिधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या उभारणीला सुरुवात झाली. आत्तापर्यंत मुख्यालयासाठी एक हजार वीस हेक्टर जागा अधिसुचित झाली. त्यातली 430 हेक्टर जागा संपादित करण्यात आलीय. मात्र या संपादीत जागेपैकी 60 टक्क्याहून जास्त जागा विनावापर पडून आहे. तरीही, अधिसुचित जमिनिपैकी आणखी जागा संपादीत करण्यासाठी शेतक-यांना नोटीसा पाठवल्या जात आहे. जमीन मोठ्या प्रमाणात अधिसुचित असल्यामुळे इथल्या शेतकर्‍यांना घराच्या बांधकामासाठी किंवा व्यवसायासाठी बिनशेती परवानगीही मिळत नाहीय. ओरोसमधल्या रस्त्यांची तर अशी दुरावस्था आहे. तर, दुसरीकडे खाजगी व्यक्तींना वाणिज्य आणि निवासी संकुलांसाठी जागा दिली जातेय . त्यामुळे गरज नसताना आपली जमीन शासन अधिसुचित का ठेवतंय, असा संतप्त सवाल विचारत शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2014 09:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close