S M L

ऑस्ट्रेलियन ओपन - सानिया मिर्झा पराभूत

Samruddha Bhambure | Updated On: Jan 26, 2014 05:51 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन - सानिया मिर्झा पराभूत

994710_705532309479040_497491185_n26 जानेवारी : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात विजेतेपद पटकाविण्यात भारताच्या सानिया मिर्झाला अपयश आले. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीमध्ये सानिया आणि तिचा रूमानियाचा जोडीदार होरिया टकॅयू यांचा डॅनियल नेस्टर-क्रिस्टीना म्लादेनोव्हिक या जोडीने सानिया-होरिओचा ३-६, २-६ असा पराभव केला.

 

सानियाने यापूर्वी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०१२ मध्ये फ्रेंच ओपन या स्पर्धांमध्ये मिश्र दुहेरीत अजिंक्यपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया व होरिआने चमकदार कामगिरी करत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण आखेर त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2014 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close