S M L

नरेंद्र मोदी आणि लतादीदी आज एकाच व्यासपीठावर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2014 07:48 PM IST

नरेंद्र मोदी आणि लतादीदी आज एकाच व्यासपीठावर

27 जानेवारी :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. 'ए मेरे वतन के लोगो...' या अजरामर गीताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची आज सांगता होणार आहे. त्यानिमित्ताने आज होणार्‍या कार्यक्रमात लता मंगेशकर, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. कवी प्रदीप यांच्या लेखनीतून उतरलेल्या आणि लता दीदींनी स्वरबद्ध केलेल्या 'ए मेरे वतन के लोगों...' या गाण्याला आज 51 वर्ष पूर्ण होतं आहेत. त्या निमित्ताने मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्स मौदानावर आज सुमारे एक लाख लोक हे गाणं गाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close