S M L

राज ठाकरेंचा 'आदेश' तपासणार !

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2014 04:45 PM IST

राज ठाकरेंचा 'आदेश' तपासणार !

2352 raj on toll27 जानेवारी : 'राज्यभरात कुठेही टोल भरू नका, तुम्हाला कोणी टोल भरण्यासाठी अडवलं तर त्याला तुडवा' मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'आदेशा'ची गृहमंत्रालयानं दखल घेतलीय. राज ठाकरेंचं भाषण तपासण्याचे आदेश गृह खात्याने कायदा मंत्रालयाला दिले आहे.

राज ठाकरेंनी वाशी इथं मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते झालं. यावेळी राज यांनी समस्त मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदेश जारी केला. राज्यात कुठेही टोल मागितले तर तुडवून काढा जे होईल ते पाहुन घेऊ असे आदेश राज यांनी दिले. राज यांनी आदेश दिल्यानंतर काही तासातच मनसे कार्यकर्त्यांनी टोलफोड सुरू केलीय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या राड्यामुळे राजकारण आता तापत चाललंय.

चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलीय. कायदा हातात घेऊन कोणतेही निर्णय होत नाही असा सल्लाही त्यांनी दिला. तर टोलच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा असल्यानं मनसेनं हे आंदोलन सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close