S M L

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सरस्वती मुंडेला जामीन

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2014 07:49 PM IST

Image img_216452_sarswatimunde_240x180.jpg27 जानेवारी : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बीडमधल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातल्या आरोपी डॉ. सरस्वती मुंडे यांना आज (सोमवारी) सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र, खटल्याचं कामकाज पूर्ण होईपर्यंत त्यांना प्रॅक्टिस करायला मनाई करण्यात आली आहे. डॉ. सरस्वती मुंडे आणि त्यांचे पती डॉ. सुदाम मुंडे यांच्यावर स्त्रीभ्रूण हत्या केल्याचा आरोप आहे.

2012 साली बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी मुंडे दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये विजया पटेकर या महिलेचा गर्भपात करतांना मृत्यू झाला होता. तसंच त्याअगोदरही मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचं उघड झालं होतं. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र अटक टाळण्यासाठी 26 दिवस मुंडे दाम्पत्य फरार झाले होते त्यानंतर त्यांनी स्वत: हुन मुंडे दाम्पत्य पोलिसांना शरण आले होते.

जामीन आणि कारवाई टाळण्यासाठी मुंडे दाम्पत्यांनी कायद्याचा पळवाटा शोधून प्रयत्न केले. सप्टेंबर 2012 मध्ये अंबाजोगाई कोर्टाने 3 लाखांच्या जातमुचलक्यावर मुंडे दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. पण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मुंडे दाम्पत्यांचा प्रॅक्टिस करण्याचा परवान 5 वर्षासाठी रद्द केलाय. आज सुप्रीम कोर्टाने कौन्सिलचा निर्णय कायम ठेवत खटल्याचं कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रॅक्टिस करण्यास मनाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close