S M L

26 / 11 मधले सगळे हल्लेखोर पाकिस्तानीच

26 फेब्रुवारी, मुंबई सुधाकर कांबळे मुंबईत 26 नोव्हेबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्याबाबत अखेर बुधवारी चार्जशिट दाखल झाली. ही चार्जशिट म्हणजे पाकिस्तान विरोधातील एक मोठा पुरावाच आहे. किंबहुना ही पाकिस्तान विरोधातीलच चार्जशिट असल्यास दिसून येतंय. कारण या हल्यातील सर्व सूत्रधार आणि हल्लेखोरही पाकिस्तानीच होते. मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी हल्ला झाला. हा हल्ला पाकिस्तान्यांनी केला, असा आरोप होत असताना, पाकिस्तानचे मात्र पुरावे द्या पुरावे द्या असंच तुणतुण चालल होतं. आता हे घ्या ढीगभर पुरावे, असं म्हणायची वेळ आलीये. सुरुवातीला कसाब याला पकडल्या नंतर त्याने त्याच्या पाकिसातानातील गावाबाबत माहिती सांगितली होती. तो मूळचा पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्यातील दिपालपूर तालुक्यातील फरिद कोट गावचा. एवढंच नव्हे तर , कसाबचे इतर जे नउ साथिदार ठार झाले, त्यांची कुंडलीचं पोलिसांनी त्या चार्जशिट मध्ये मांडली आहे. ती अशी....ईमाईल खान उर्फ अबु ईस्माईल हा पंजाब प्रांतातील डेरा ईस्माईल खान येथील आहे.इमरान बब्बर उर्फ अबु आकाशा हा पंजाब प्रांतातील मुलतानचा आहे.नासिर उर्फ अबु उमर हा फैसला बादचा आहे.नझिर अहमद हाही फैसलाबादचा आहेहाफिज अहमद उर्फ अर्शद उर्फ अब्दुल रेहमान बडा उर्फ हयाजी हा देखिल पंजाब प्रांतातील मुलतानचा आहे.अब्दुल रेहमान छोटा उर्फ साकिब हा मुलतान रोडचा आहे.फहाद उल्ला हा उजार्शाहा मुकाम दिपालपुरचा आहे.जावेद अली उर्फ अबु अली पंजाब प्रांतातील ओकारा येथील आहे.शोएब उर्फ अबु शोएब हा पंजाब प्रांतातील सियालकोटमदल्या नारोवल इथला आहे.ही सर्व माहिती चार्जशिट मध्ये नमूद करण्यात आलीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हल्यासाठी दहा जण मुंबईत आले होते. दहा दहशतवाद्यांनां डिसेंबर 2007 ते नोव्हेंबर 2008 ते या काळात ट्रेनिंग देण्यात आलंय. सुरुवातीला हे ट्रेनिंग डिसीप्लीनचं होतं.हे ट्रेनिंग पास झाल्यानंतर त्यांची पुढच्या फेस साठी निवड व्हायची.पुढच्या फेस मध्ये महत्वाच मिशन कसं यशस्वी करायचं. त्यासाठी कायकाय करायचं याबाबत होतं.या ट्रेनिंग मध्ये त्यांना फिजीकल फिटनेस ,स्विमिंग , हत्यारं हाताळनं, गुप्त माहिती गोळा करणं ,गोरिल्ला पद्धतीच युद्ध.अत्याधुनिक हत्यार हाताळनं, हॅन्डग्रेनेडचा मारा करने, रॉकेट लॉंचंरचा मारा करने,अशा पद्धतीचं दहशतवादी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर हल्ला करताना पोलिसांच्या हल्यात जखमी झाल्यास त्यावर स्वताचं कसा उपचार यांचं ही प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं होतं. हे ट्रेनिंग मुरिदके, मानशेरा, मुझपुराबाद ,अझिझाबाद , पांची टेनी अशा ठिकाणी झालं.हे भाग काही पाकिस्तानात , तर काही पाकिस्तानव्याप्त काश्मिर मध्ये आहेत. मुंबई हल्ल्यादरम्यानचं दहशतवाद्याचं वागण पाहता, या कडव्या ट्रेनिंगची कल्पना येते. त्यावरूनच मुंबई हल्ल्यातले बहुतेक सगळे पाकिस्तानी आहे. पण पडद्यामागचे ,पाकिस्तानातील दहशतवादी वेगळेच आहेत. ते एक- दोन नव्हे तर, चक्क 35 आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तान्यांची नावं कधीच उघडकीस आली नव्हती.पण केवळ तीन महिन्यांच्या तपासात मुंबई पोलिसांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचं जाळचं उघडकीस आणलंय. हाफिज मोहम्मद सईद उर्फ हाफिज साब, झकि-उर रेहमान, अबु हमजा, अबु अल कामा उर्फ अमजीद, मेजर जनरल साब, मुंज्जमील उर्फ युसूफ , झरार शहा, अबु फहाद शहा, अबु अब्दुल रेहमान , अबु अनास, अबु बशिर, अबु इमरान, अबु मुफ्ती सईद, हकिम साब, अबु उमर सईद, खराक सिंग, मोहम्मद अशफाक, जावेद इक्बाल, साजिद इफ्तिखार, कर्नल आर.सादत उल्ला, खुराम शहादाद, अबु अब्दुल रेहमान, अबि माविया, अबि अनिस, अबु बशिर, अबु हंजला पठाण, अबु सैफ उर रेहमान, अबु इमरान , हकिम साहेब या प्रमुख नावांबरोबर एकूण 35 पाक दहशतवादी आहेत.हे सर्व कट्टर दहशतवादी आहेत. यातील मेजर जनरल साब आणि कर्नल आर. सादत उल्ला हे दोघे तर पाकिस्तानी लष्करातील माजी अधिकारी आहेत. अर्थात त्यांचा आयएसआयशी संबध असण्याची शक्यता आहेचं..हाफिज मोहम्मद सईद उर्फ हाफिज साब हा लष्कर-ए-तैयब्बाचा संस्थापक आहे. इतरांनी कसाब आणि त्याच्या साथिदारांना ट्रेनिंग दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2009 04:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2009 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close