S M L

कोल्हापुरात पुन्हा टोल वसुली, पुन्हा 'टोल'फोड ?

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2014 11:05 PM IST

kolhapur toll update27 जानेवारी : राज्यभरात मनसेच्या आंदोलनानं टोलचं प्रकरण पेटलेलं असतानाच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा टोलधाड पडण्याची शक्यता आहे. आज रस्ते विकास प्रकल्प राबवणार्‍या आयआरबी कंपनीने कोल्हापूरच्या महापालिकेला टोलवसुली सुरू करणार अशा आशयाचं एक पत्र पाठवलं आहे.

कोल्हापूरचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख यांना या पत्रांच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत. या पत्रामध्ये आजपासून टोलवसुली सुरू करणार असल्याचं सांगत कोल्हापूर पोलिसांनी आपल्याला संरक्षण पुरवावं अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे आता टोलविरोधी कृती समिती आक्रमक झाली असून कृती समितीचे कार्यकर्ते टोलनाक्यांची पाहणी करत आहेत. मात्र, अद्याप आयआरबी कंपनीचे कामगार टोलनाक्यांवर आलेले नाहीत. मात्र या पत्रानुसार कोल्हापूर शहरात कोणत्याही क्षणी टोलवसुली सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, टोलप्रश्नी उद्या मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांना भेटणार असल्याचं कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांननी सांगितलंय.

पोलीस अधिकार्‍यांसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

दरम्यान, कोल्हापूरमध्ये अधिकार्‍यांसाठी आता नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. टोलबाबतच्या आंदोलनामध्ये कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर पोलीस दलातल्या 2 अधिकार्‍यांचं काही दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आलंय. त्यामध्ये पोलीस उपअधिक्षक विठ्ठल पवार आणि पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांचा समावेश आहे. या अधिकार्‍याचं निलंबन रद्द करावं तसंच अतिरक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांची नागपुरला झालेली बदली रद्द करावी या मागणीसाठी आज 3 आंदोलनं करण्यात आली. शिवसेनेनं जोरदार घोषणाबाजी करत या अधिकार्‍यांच्या समर्थनार्थ आज आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close