S M L

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध?

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2014 11:33 PM IST

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध?

ruyurf427 जानेवारी : राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या सात जागांसाठी 7 फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. या सात जागांसाठी सहा उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

 

कारण, महायुतीच्या वतीने भाजपच्या जागेवरून आरपीआय नेते रामदास आठवले अर्ज भरणार आहेत. तर शिवसेनेकडून राजकुमार धूत यांनी अर्ज भरलाय. मनसेच्या 11 मतांना महत्त्व मिळू नये म्हणून शिवसेनेनं दुसरा उमेदवार द्यायचा नाही, हे जवळजवळ निश्चित केलं आहे.

 

तर सोमवारी सकाळीच काँग्रेसकडून मुरली देवरा आणि हुसेन दलवाई यांनी अर्ज भरले आहेत. तर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजिद मेमन यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे सातव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार संजय काकडे यांच्या पदरात काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांबरोबरच इतर छोटे-मोठे पक्ष आणि सेना-भाजपची उरलेली मतं मिळण्याची दाट शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 11:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close