S M L

मॅच गेली, मालिकाही गेली

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2014 03:36 PM IST

मॅच गेली, मालिकाही गेली

nez vs india28 जानेवारी : सलग दोन मॅचमध्ये पराभव आणि तिसरी वनडे टाय झाल्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या वनडेत भारताला गाशा गुंडाळावा लागलाय. हॅमिल्टनमध्ये चौथ्या वन डेत न्यूझीलंडनं भारताचा 7 विकेटनं धुव्वा उडवला आहे. या पराभवाबरोबरच भारतानं सीरिजही गमावलीय. पहिली बॅटिंग करताना भारताने 5 विकेटवर 278 रन्स केले होते. विजयाचं हे आव्हान न्यूझीलंडनं 3 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

रॉस टेलरनं 112 रन्सची मॅच विनिंग खेळी केली. मागिल तीनही मॅचमध्य धोणीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे यावेळी महेंद्र सिंग धोणींने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र ओपनिंगला आलेला विराट कोहली अवघ्या 2 रन्सवर आऊट झाला तर अजिंक्य रहाणेही 3 रन्सवर माघारी परतला.

भारताची टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर या दौर्‍यात पहिलीच मॅच खेळणारा अंबाती रायडू 37 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोणीने प्रत्येकी 79 रन्सवर केले तर रवींद्र जडेजाने 61 रन्स केले. तर कॅप्टन धोणी आणि रवींद्र जडेजानं सहाव्या विकेटसाठी 127 रन्सची पार्टनरशिप करत समाधानकारक स्कोअर उभा करुन दिला. मॅचच्या अखेरीस भारताने 5 विकेट गमावत न्यूझीलंडसमोर 279 रन्सचं टार्गेट ठेवलं पण याला उत्तर देताना न्यूझीलंडने 1 विकेटवर 54 रन्स अशी अवस्था होती. पण गेल्या तीनही मॅचमध्ये फॉर्मात असलेल्या रॉस टेलरने 112 रन्सची बाजी मारत मॅच विनिंग खेळी केली. न्यूझीलंडने भारताचा 7 विकेटने धुव्वा उडवत मॅच तर खिशात घातली मालिकेवर आपली मोहरही उमटवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2014 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close