S M L

अखेर संतोष आंबेकर गजाआड

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2014 11:16 PM IST

अखेर संतोष आंबेकर गजाआड

29 जानेवारी : पोलीस स्टेशनमध्ये बिल्डरावर पिस्तुल रोखून 65 लाखांचे चेक लिहुन घेणार्‍या कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्यात. संतोष आंबेकरला आज (बुधवारी) संध्याकाळी अटक करण्यात आली.   त्यानं सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने तो फेटाळला. त्यानंतर वकील आर. के. तिवारींच्या गाडीतून आंबेकर पळून जात होता. त्याचवेळी क्राईम ब्रँचने कोर्टाच्या परिसरातच त्याला अटक केली.

बिल्डर जितेंद्र चव्हाणवर पोलीस ठाण्यातच पिस्तूल रोखून खंडणी वसूल केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पण आपला जामीन फेटाळला जाणार हे कळताच त्याने कोर्टातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या कामात त्याच्या वकिलांनीच त्याला मदत केली. त्यामुळे वकील आर. के. तिवारी यांचीही आता चौकशी होणार आहे.

दरम्यान, आंबेकरला केवळ अटक करून उपयोग नाही, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी नागपूरकरांची मागणी आहे. दरम्यान, गुंड संतोष अंाबेकरचा वावर राजकीय नेत्यांसोबत होता, याचा पुरावा आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या हिंदू मुस्लिम एकता कमिटीच्या कार्यक्रमाचे पोस्टर्स अजूनही नागपूर शहरात दिसत आहे. या पोस्टर्समध्ये संतोष आंबेकरसोबत भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचे फोटो दिसत आहे. त्यासोबतच अनेक स्थानिक नेत्यांचे फोटोसुद्धा इथे झळकत आहेत. या पोस्टरमुळे या नेत्यांचा थेट संबंध जरी सिद्ध होत नसला, तरी आंबेकरची ऊठबस सार्वजिनक जीवनात होती, एवढं तरी नक्कीच सिद्ध होतंय.

कोण आहे गुंड संतोष आंबेकर ?

- संतोष आंबेकर तीन वेळा मोक्कामध्ये निर्दोष सुटला

- अनंत सोवनी खून प्रकरणात अडीच वर्षांपासून जामिनावर

- व्यापार्‍यांकडून खंडणी मागण्यात अग्रेसर

- वादातील मालमत्ता घेणं, धमकावून मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी कुप्रसिद्ध

- इतवारी परिसरातल्या प्रशस्त बंगल्यात लोकांना बोलावून धमकावणं

- नागपूरमधल्या अनेक राजकीय पक्षातल्या नेत्यांशी संबधाची चर्चा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2014 08:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close