S M L

वाळू माफियांचा धुमाकूळ, 'तापी'तून शेकडो ब्रासचा उपसा

Sachin Salve | Updated On: Feb 1, 2014 04:26 PM IST

वाळू माफियांचा धुमाकूळ, 'तापी'तून शेकडो ब्रासचा उपसा

jalgaon sand01 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातलाय. अमळनेर आणि चोपडा तालुक्यातून वाहणार्‍या तापी नदीतून दररोज बेकायदेशीरपणे शेकडो ब्रास वाळू 200 ते 300 डंपरनं उपसा केली जातेय.

उपविभागीय अधिकार्‍यांनी महसूल यंत्रणेला संबंधित वाळू माफियांना सरकारी नियमानुसार काम करण्याच्या सूचना दिल्यात. यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र कारवाई होताना दिसत नाही.

त्यामुळे वाळू माफियांना थांबवण्याची जबाबदारी केंद्रीय पर्यावरण विभागाने घ्यावी अशी मागणी जिल्ह्यातून होतेय. मोठ्या प्रमाणात होणार्‍या वाळू उपशामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी खालावलीय. त्यामुळे पिण्यासाठी,जनावरांना आणि शेतीला पाणी मिळणार कसं असा प्रश्न विचारला जातोय. शेकडो ब्रास वाळूचा उपसा नद्यांमधून केला जातोय.

एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा वाळू उपसा बघता वाळू माफियांवर लगाम लावण्याचे राज्य सरकारचे वाळू धोरण किता फोल होते हे सुद्धा उघडकीस आले.प्रचंड होणार्‍या वाळू उपश्यामुळे शेतकरी आणि पर्यावरण वादी यांनी चिंता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2014 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close