S M L

कसाबच्या सुरक्षेसाठी 200 पोलिसांचं विशेष पथक

28 फेब्रुवारी, मुंबई सुधाकर कांबळे मुंबई हल्यातला आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिलाय. कसाबला मारण्यासाठी 30 आत्मघातकी दहशतवादी मुंबईत येण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळालीय. त्यामुळं मुंबई पोलिसांनी कसाबच्या सुरक्षेसाठी विशेष पथक बनवलंय. या विशेष पथकात 200 तरूण पोलिसांचा समावेश आहे. मोहम्मद अजमल कसाब उर्फ अबू मुजाहिद हा 69 लोकांना ठार मारणारा क्रूर दहशतवादी. लष्कर ए तय्यबाचा सदस्य असलेल्या कसाबला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडलं. असिस्टंट सबइन्स्पेक्टर तुकाराम ओंबळेंच्या बलिदानानं हे शक्य झालं. या कसाबमुळं पाकिस्तानी दहशतवादाचा काळा चेहरा जगासमोर आला. कसाबला पकडल्यामुळं लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश झाला. आता या कसाब नावाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होणार हे मुंबई पोलीस ओळखून आहेत. त्यात कसाबला ठार मारण्यासाठी 30 आत्मघातकी दहशतवादी येत असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळं कसाबला कोर्टा हजर केलं जाणार नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. कसाबच्या जीवाला जेल मध्येही धोका होऊ शकतो म्हणून त्याच्यासाठी वेगळ जेल बनतय.त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे.पण त्याने ही प्रश्न सुटत नसल्याने यासाठी आता एक विशेष पथक बनवण्यात आलंय. प्रचंड अत्याधुनिक असं हे पथक असणार आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी 200 तरूण पोलिसांचं पथक बनवण्यात येत आहे. पस्तिशीच्या आतल्या पोलीस शिपायांची यासाठी निवड केली जाणार आहे. यापैकी 100 पोलिसांकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या रायफली असणार आहेत. 50 शिपायांकडं एके-47 रायफली असणार आहेत. तर 30 पोलिसांकडे एसएलआर असणार आहेत. याशिवाय 20 कार्बाईनधारी पोलीस कसाबच्या सुरक्षिततेसाठी तैनात केले जाणार आहेत.कसाबसाठी बनवण्यात येणार्‍या बुलेटप्रुफ जेलजवळ 20 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. बाथरुममध्ये जातानाही कसाबवर 6 पोलिसांची नजर असणार आहे. कसाब सध्या आर्थर रोड जेल मध्ये आहे. तिथंही कधी नव्हे ते दोन वायरलेस सेट बसवण्यात आलेत.आर्थर रोड जेल आणि जवळपासच्या परिसरातील प्रत्येक घडामोडीची माहिती दर मिनिटाला या वायरलेसच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यत पोहचत असते. तसंच इथल्या प्रत्येक रस्त्यांवर पोलीस दलातील वेगवेगळ्या विभागाचे पोलीस पाहर्‍यासाठी असणार आहेत. आजपर्यंत मंत्रालय, भाभा अणुशक्ती केंद्र, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या संस्था आणि व्यक्तींच्या सुरेक्षासाठी सर्वात जास्त पोलीस तैनात आहे. पण मुंबईतल्या 26 / 11 च्या घटनेतला एकमेव जीवंत आरोपी आणि साक्षीदार म्हणून कसाबला एवढी सुरक्षा दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2009 06:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2009 06:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close