S M L

जागावाटपाचं चित्र येत्या 8 दिवसांत होणार स्पष्ट :शरद पवार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2014 03:56 PM IST

Image sharad_pawar_bit_300x255.jpg02 फेब्रुवारी :काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. चर्चेसाठी थोडा वेळ लागतो. पण येत्या 8 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. जागावाटपाला काँग्रेस वेळ लावतोय असं राष्ट्रवादीकडून सातत्यानं सांगितलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर पवारांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

दरम्यान, पवारांनी उद्या मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलीय...पवार सात मतदारसंघाचा पुन्हा आढावा घेणारेत. मावळ, शिरूर, नगर, जळगाव, रावेर, परभणी आणि बीड या मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांशी उद्या शरद पवार चर्चा करणारेत. देवगिरी बंगल्यावर उद्या सकाळी साडे नऊ वाजता ही बैठक सुरू होणार आहे.

राज्यात द्वेषाचं राजकारण कधी नव्हतं मात्र, विरोधीपक्षांनी ते राजकारण आता राज्यात सुरू केल्याची कडक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. राजकारणात टीकेला स्थान आहे. मात्र नेत्यांच्या हातात आसूड देण्याची घटना कधी घडली नव्हती असं म्हणत त्यांनी महायुतींच्या नेत्यांवर टीका केली.

येणार्‍या निवडणुकीनंतर देशाला स्थिर सरकार मिळणं गरजेचं आहे. काँग्रेस आणि मित्र पक्षांनी देशाला असं सरकार दिलंय आणि पुन्हाही लोक संधी देतील, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2014 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close