S M L

शुक्लांनी 'तो' भूखंड परत केलाच नाही -सोमय्या

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2014 05:42 PM IST

Image img_210432_kiritsomiya_240x180.jpg06 फेब्रुवारी : अंधेरीतल्या जमीन घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केलाय. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्लांनी ही जमीन अजूनही परत केलीच नसल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय.

जोगेश्वरीमधील कोट्यवधींची जमीन शुक्ला यांना फक्त 98 हजारांना मिळवली होती. शुक्लांच्या बीएजी (BAG) फिल्म्स एज्युकेशन सोसायटीला ही जमीन मिळाली होती. पण त्यावर एसआर ए (SRA) स्किम लागू करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

मीडियात ही बातमी आल्यानंतर शुक्लांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून जमीन परत करणार असल्याचं म्हटलं होतं. पण अजूनही ही जमीन परत करण्यात आलेली नाही. यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोमय्यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2014 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close