S M L

शिवाजीराव मोघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2014 12:17 PM IST

Image img_140662_shivajiraomoghe_240x180.jpg07 फेब्रुवारी : सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पारवा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या अद्यक्षपदी अयुनोद्दीन सोलंकी यांची नेमणुुक करण्यासाठी मोघे आणि देवानंद पवार यांनी 25 लाख रुपये घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केल्यानं सोलंकी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

यावर हायकोर्टाने शिवाजीराव मोघे आणि देवानंद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हायकोर्टाने या प्रकरणात यवतमाळचे एसपी रंजन शर्मा, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, पारव्याचे एपीआय पंजाब वंजारी यांच्या विरुद्धात नोटीस बजावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2014 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close