S M L

न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या वन डेत भारताचा विजय

3 मार्च, नेपिअर भारतानं यजमान न्यूझीलंडविरुध्दची पहिली वन डे दिमाखात जिंकली. नेपियर मध्ये रंगलेल्या या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनं दमदार कामिगरी केली. हरभजन भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. पावसाच्या व्यतयानं मॅच प्रत्येकी 38 ओव्हर्सची करण्यात आली. पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं चार विकेट गमावत 273 रन्स केले. सेहवागनं धडाकेबाज बॅटिंग करत 77 रन्स केले. तर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं कॅप्टन इनिंग खेळत नॉटआऊट 84 रन्स केले. पण यावर कळस चढवला तो सुरेश रैनानं. रैनानं 4 सिक्स आणि पाच फोर मारत अवघ्या 39 बॉलमध्ये 66 रन्स केले. विजयाचा पाठलाग करणार्‍या न्यूझीलंडची सुरवात डळमळीत झाली. ओपनर बँडम मॅक्यूलमला प्रविणकुमारनं शुन्यावर आऊट केलं. तर जेसी रायडरला त्यानं झटपट पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं. मार्टिन गुप्टिलनं एकाकी लढत देत 64 रन्स केले. पण इतर बॅटसमनचा भारतीय बॉलर्ससमोर टीकाव लागला नाही. न्यूझीलंडचे तब्बल चार बॅटसमन शुन्यावर आऊट झाले. प्रविण कुमारनं दोन तर हरभजन सिंगनं तीन विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2009 09:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2009 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close