S M L

संजय दत्तला हवी आणखी ३० दिवसांची पॅरोल रजा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 9, 2014 09:07 PM IST

संजय दत्तला हवी आणखी ३० दिवसांची पॅरोल रजा

sanjay baba09 फेब्रुवारी :  १९९३ च्या बाँबस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला आणखी ३० दिवसांची पॅरोल रजा हवी आहे. पत्नी मान्यताचे आजारपण व मुलांकडे लक्ष देण्याचे कारण पुढे करत संजूबाबाने पॅरोलसाठी अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले.

१९९३ च्या बाँबस्फोटांमध्ये बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच संजय दत्त सुमारे दीड वर्ष तुरुंगात होता. गेल्या वर्षी मेमध्ये न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला आणखी तीन वर्ष तुरुंगात काढावी लागणार आहेत. मात्र तुरुंगात गेल्यापासून संजय दत्त वारंवार पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर येत आहे.

यापूर्वी त्याने स्वतःच्या व तसेच पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण देत पॅरोल रजा मंजूर करुन घेतली होती. २२ डिसेंबरपासून संजय दत्त पॅरोल रजेवर बाहेर आला असून २२ फेब्रुवारीला त्याला पुन्हा तुरुंगात हजर राहावे लागणार आहे. मात्र यापूर्वीच संजय दत्तने आणखी ३० दिवसांनी रजा वाढवून देण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2014 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close