S M L

मनसेच्या पदाधिकार्‍यांना जमावबंदीची नोटीस

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2014 04:26 PM IST

मनसेच्या पदाधिकार्‍यांना जमावबंदीची नोटीस

45 mns toll 346310 फेब्रुवारी : येत्या 12 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असून हिंमत असेल तर रोखून दाखवा असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरूवात केलीय.

मुंबई पोलिसांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांना जमावबंदीची नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद इथं पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटिसा काढल्या आहेत.

त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या येणेगुर टोल नाक्याला कुलुप ठोकले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांचा संताप पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी पळ काढला.

दरम्यान, राज ठाकरेंनी कायद्याला आव्हान देवू नये, असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. शांततेनी होण्यार्‍या आंदोलनाला विरोध नाही. मात्र कायदा हातात घेण्याची भाषणा करणार्‍यांना सरकार सोडणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गरज पडल्यास राज ठाकरेंना अटक करण्यास पोलीस कचरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2014 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close