S M L

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतावरील बंदी उठवली

Samruddha Bhambure | Updated On: Feb 11, 2014 03:53 PM IST

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतावरील बंदी उठवली

11 फेब्रुवारी :  इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच 'आयओए'वरची बंदी उठवली  आहे. त्यामुळे भारताचा ऑलिम्पिक्समध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी आज (मंगळवारी) सांगितलं.

तब्बल 14 महिने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी घालण्यात आली होती नंतर आयओसीच्या अटीप्रमाणे आयओएनं पदाधिकार्‍यांची निवडणूक घेतली. भारतीय ऑलिंपिक संघटनांच्या निवडणुकांनंतर दोन दिवसांतच आयओसीने बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सोची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना तिरंग्याखाली खेळता येईल.

डिसेंबर 2012ला, आयओएशी संबंधित असलेल्या कलंकित पदाधिकार्‍यांमुळे या संघटनेवरच बंदी घालण्याचा निर्णय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीनं घेतला होता, त्यामुळे भारताला सोची ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा झेंडे घेऊन उतरता आले नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2014 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close