S M L

शरद पवारांसाठी एनडीएचे दारं खुले -गडकरी

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2014 04:20 PM IST

शरद पवारांसाठी एनडीएचे दारं खुले -गडकरी

574hbdgadkari 34611 फेब्रुवारी :  राष्ट्रवादीला एनडीएमध्ये थारा नाही असं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे ठासून सांगत असतानाच भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. काँग्रेस सोडून सर्वच राष्ट्रीय पक्षांसाठी एनडीएची दारं खुली असल्याचं गडकरी यांनी आयबीएन 7 शी बोलताना सांगितलं.

गोपीनाथ मुंडे काय म्हणताय हे तेच सांगू शकतात पण शरद पवार यांच्याशी यावर बातचीत झाली नाही. पण शरद पवार असो अथवा ममता बॅनर्जी असो, जयललीता असो, चंद्रबाबू नायडू असो या सर्वांसाठी एनडीएचे दारं खुले आहे आम्हाला एनडीए मोठी करायची आहे त्यामुळे सर्वांसाठी दारं खुली आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे भाजपमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालंय. या आधीही टोलच्या प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी परस्परविरोधी भूमिका मांडल्याने चर्चेला उधाण आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांना राष्ट्रवादीत यायाचं होतं पण मी विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश थांबला असा खळबळजनक खुलासा केला होता.

मात्र या अगोदर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला होता. पण या प्रकरणावर पडदा टाकत खुद्द शरद पवार यांनी मोदींना भेटलो त्यात गैर काय ? कुण्या पाकिस्तानी अथवा चिनी माणसाला तर भेटलो नाही ना ? कृषिमंत्री असल्यामुळे मला राज्यातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटावे लागते असा खुलासा पवार यांनी केला. मात्र पवार आणि मोदींच्या बातमीमुळे महायुतीच्या गोटात गोंधळ उडाला होता. एकीकडे मुंडेंनी राष्ट्रवादीला ठाम विरोध केलाय तर दुसरीकडे आता गडकरींनी 'दार' उघडल्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2014 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close