S M L

जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याला विष्ठा चारली !

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2014 05:38 PM IST

जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याला विष्ठा चारली !

346 yavatmal news11 फेब्रुवारी : यवतमाळमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एका दाम्पत्याला मानवी विष्ठा खाऊ घालण्याची घृणास्पद घटना घडलीय. बोर्डा गावातल्या गजानन राजूरकर आणि त्यांच्या पत्नीवर हा प्रसंग बेतलाय. या प्रकरणी अनिल काकडे आणि पांडुरंग काकडे यांना अटक करण्यात आली आहे.

गजानन राजूरकर यांच्या शेजारी राहणार्‍या काकडे परिवारातल्या लोकांनी जादूटोण्याच्या संशयावरुन गजानन यांच्या पत्नीला आधी बेदम मारहाण केली. पत्नीचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावून आलेल्या गजानन यांच्या अंगावरही काकडे कुटुंबीय धावून गेले. इतकंच नाही तर त्यांच्या अंगावर विष्ठा टाकून ती त्यांच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्नही केला, असा आरोप गजानन राजूरकर यांनी केलाय.

2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेची लगेच तक्रारही करण्यात आली. मात्र पोलिसांनी गांभीर्याने या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही. पुन्हा 8 फेब्रुवारीला तक्रार केल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यानंतर पोलिसांनी काकडे कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अनिल काकडे आणि पांडुरंग काकडे यांना अटक करण्यात आलीय. या घृणास्पद घटनेत काकडे दाम्पत्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे यवतमाळचे जिल्हाध्यक्ष सुरेश वर्भे यांनी केलीय.

पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत दिरंगाई केली. 2 तारखेला घडलेल्या घटनेची तक्रार घेण्यास सुरुवातीला पोलिसांना टाळाटाळ केली. पण त्यानंतर तब्बल 6 दिवसानंतर आठ फेब्रुवारीला राजूरकर पोलीस स्टेशनला गेले असतात तक्रार दाखल करुन घेतली पण त्यामुळे विष्ठा चारली, अंगावर विष्ठा फेकली हे शब्द वगळण्यात आले होते पण अनिसच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली त्यानंतर पोलिसांनी हे शब्द दाखल करुन घेतले आहे असं सुरेश वर्भे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2014 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close