S M L

काँग्रेस 'जय हो' या गाण्याचे हक्क विकत घेण्याच्या प्रयत्नात

4 मार्च दिल्ली रूपश्री नंदा 'जय हो' या गाण्यानं गुलजार आणि रेहमान यांना ऑस्कर अवॉर्ड मिळवून दिला. आता याच गाण्याच्या मदतीनं मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस या गाण्याचं हक्क विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे.सध्या ' जय हो' हे गाणं जगभरातील प्रत्येक व्यक्तींच्या ओठावर थिरकू लागलंय. प्रतिकूलतेवर मात करत जगण्याची प्रेरणा देणा-या या गाण्याची लाट ओळखूनच काँग्रेसनं या गाण्याची मदत घ्यायचं ठरवलेलं दिसतं आहे.परंतु गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पूर्वीच काँग्रेसवर टीका करण्यासाठी स्लमडॉग चित्रपटाचा उल्लेख केला आहे. पाच वर्ष काँग्रेस आघाडीचं सरकार नसलं असतं तर स्लम एरिया नसते. आणि स्लम नसले असते तर ही फिल्म बनलीच नसती असे ते म्हणाले. यावर काँग्रेसचे नेते विरप्पा मोईली सांगतात, आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय होणार आहे. त्यामुळे हे गाणं म्हणण्याचा काँग्रेसला पूर्ण अधिकार आहे.मात्र या गाण्याचा राजकीय वापर होऊ नये असं गुलजार यांनी म्हटलं आहे. रेहमानला 'जय हो'गाण्यानं ऑस्कर अवॉर्ड मिळवून दिला. पण काँग्रेसला हे गाणं करोडो मतदारांचं मत मिळवून देईल का हे पहायचंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2009 09:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2009 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close