S M L

मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासनाचे 'टोल', राज समाधानी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2014 03:50 PM IST

मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासनाचे 'टोल', राज समाधानी

prithvi Mets Ra dsadnhsjhndj13 फेब्रुवारी :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज (गुरूवार) सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. जवळपास मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात टोलवर 2 तास चर्चा झाली

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटला टोल लावणं समजू शकतो पण एक्झिट पॉईंटला टोल का लावला जातो असा सवाल राज यांनी उपस्थित केला. या बैठकीत राज यांनी मुख्यमंत्र्यांना 10 कोटींपेक्षा कमी बजेट असलेले टोलनाके बंद करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही राज यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, या टोलनाक्यांबाबत माहिती घेऊ असे सांगितले. राज्यात अशा प्रकारचे 22 टोलनाके आहेत. त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सोडलास, एकाही टोल रस्त्यावर शौचालय नाहीत असा दावाही राज यांनी या बैठकीत केला.

राज ठाकरे आज सकाळी नऊ वाजता टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले. त्यांच्यासोबत या चर्चेसाठी निवडक पत्रकारांचे एक शिष्टमंडळही होते. तसेच या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भजबळ आणि मंत्री जयदत्त क्षीरसागर व रणजित कांबळे हेदेखिल उपस्थित आहेत. मनसे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, हे सुद्धा राज यांच्यासोबत उपस्थित होते. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राज ठाकरे 21 फेब्रुवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. तर, टोलनाके फोडण्याचे आंदोलन मनसेने थांबवावे असं आवाहन मुख्यमंत्रींनी राज ठाकरे यांना केलं आहे.

राज ठाकरेंची मागणी

 • मनसेचं टोलविषयक धोरण सरकारसमोर सादर
 • मुंबईच्या एन्ट्री पॉईंटला टोल ठिक आहे पण एक्झिट पॉईंटला टोल का लावला जातो ?
 • 22 टोल नाक्यांवर टोल लावण्याची गरज नाही, ते बंद करा- 22 टोल नाक्यांची यादी केली सादर
 • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सोडला तर एकाही टोल रस्त्यांवर शौचालय नाहीत
 • महाबळेश्‍वर आणि लोणावळयात प्रदूषण टॅक्स का लावला जातो
 • खेड-शिवपूर NH1 टोल नाक्याची मुदत संपली, हा टोल नाका बंद करण्याची शिफारस केंद्राकडे करणार
 • किती अंतरावर टोल असावा, याबद्दलचे नियम निश्चित नव्हते
 •  टोलवसुलीचा कालावधी किती असावा, याबद्दलचेही नियम निश्चित नव्हते

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 • येत्या पंधरा दिवसांत राज्य सरकार टोल धोरण जाहीर करणार
 • राज्यातील 22 टोलनाके बंद करण्याचा सरकारचा निर्णय
 • 10 कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करण्याचा सरकारचा निर्णय
 • वादग्रस्त टोलचं ऑडिट करण्याबद्दल सरकार करणार विचार
 • नव्या टोल धोरणात रस्त्यांवर शौचालय बंधनकारक असणार
 • नवं टोल धोरण आधीच्या सर्व टोल कंत्राटांनाही लागू होणार
 • 15 दिवसांपूर्वी इंन्फ्रास्ट्रक्चर सब कमिटीमधे मांडलाय
 • MSRDCचे आतापर्यंत 36 टोलनाके बंद करण्यात आलेत
 • हायकोर्टाच्या मान्यतेनुसार टोलचे दर आणि वुसलीचा कालावधी ठरवण्यात आलाय
 • टोल रस्त्यावर ट्रॉमा सेंटर आणि हेलिपोर्ट उभारणार
 • जिथं टोल वसुली संपली आहे, तिथलं बांधकाम पाडलं जाणार
 • ठाणे व ऐरोली या दोन टालनाक्यांपैकी एकच टोलनाक्यावर टोल आकारला जाणार

सरकारचं नवं टोल धोरण

 •  किलोमीटरवर नाही तर प्रकल्पाच्या किंमतीवर टोल वसुली होणार
 •  एस.टी. बसेसना टोल माफ करणार
 •  टोलच्या रस्त्यांवर शौचालयं उभारणं बंधनकारक करणार
 •  सध्याच्या टोलनाक्यांवरही शौचलयं बांधणार
 •  इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून गाड्यांचा डाटा गोळा करणार
 •  राज्यातले काही टोल बंद करणा
 • ई-महापास योजना लागू करणार
 •  नवं टोलधोरण सर्व टोलनाक्यांना लागू होणार
 •  महामार्गांवर ऍम्ब्युलन्स तैनात करणार
 •  20 कोटींच्या आतले 25 ते 30 टोलनाके बंद करणार
 •  वादग्रस्त टोलनाक्यांचा आढावा घेणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2014 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close