S M L

वेलिंग्टन टेस्ट : पहिल्या इनिंग्जमध्ये भारताचं वर्चस्व

Samruddha Bhambure | Updated On: Feb 14, 2014 02:03 PM IST

वेलिंग्टन टेस्ट : पहिल्या इनिंग्जमध्ये भारताचं वर्चस्व

 IND NZ14 फेब्रुवारी :  भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची दुसरी टेस्ट मॅच आजपासून वेलिंग्टन ग्राऊंडवर सुरु झाली. आज टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं. पहिली बॅटिंग करणारी न्यूझीलंडची टीम अवघ्या 192 रन्सवर ऑलआऊट झाली. यात ईशांत शर्माच्या नवावर 6 तर मोहम्मद शमीच्या नावावक 4 विकेट्सची नोंद झाली. त्यानंतर भारताने पहिल्या दिवस अखेर 2 विकेट गमावत 100 रन्स केले आहेत तर धवन 71 रन्सवर नॉटआऊट आहे.

भारत विरूध्द न्यूझीलंडमधील दुसर्‍या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलर्सनी न्यूझीलंडचा पहिला डाव 192 रन्सवर संपवला. वेलिंग्टनमध्ये सुरू असलेल्या या दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि कप्टन धोणीचा हा निर्णय योग्य ठरला.

वेलिंग्टनच्या पीचवर भारतीय बॉलर्सनी पहिल्या बॉलपासून न्यूझीलंडच्या बॅटसमनवर दबाव ठेवला होता. भारतातर्फे सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला इशांत शर्मा त्याने तब्बल 6 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद शमीने 4 विकेट्स मिळवल्या. झहीर खान, इशांत आणि शमी या त्रिकुटाने न्यूझीलंडला जखडून ठेवल्याने त्यांचा डाव 192 रन्समध्येच संपला.

भारताला ह्या टेस्टमध्ये विजय मिळवून सिरीजमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. याआधी भारताने पहिली टेस्ट गमावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2014 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close