S M L

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची आज घोषणा ?

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2014 08:49 PM IST

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची आज घोषणा ?

vijay kamble15 फेब्रुवारी : महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या बढत्या आणि बदल्यांबाबत आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकाने स्थापन केलेल्या पोलीस आस्थापना बोर्डाने रखडलेल्या सर्व बढत्या आणि बदल्यांबाबत राज्य सरकारला शिफारसी केल्या आहेत.

त्यामुळे आज रखडलेल्या सर्व बदल्या-बढत्यांवरील नियुक्त्यांच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या जाव्यात अशी सूचना निवडणूक आयोगानं राज्य सरकारला केली आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नेमणूक होते याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. डॉ. सत्यपाल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर गेले 14 दिवस हे पद रिक्त आहे. या पदावर विजय कांबळे, राकेश मारिया किंवा सतीश माथूर यांच्यापैकी एकाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. यावेळी विजय कांबळे यांना सेवा ज्येष्ठते नुसार पोलीस आयुक्त होऊ शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

कोण होणार मुंबई पोलीस आयुक्त?

  • - जावेद अहमद - पोलीस महासंचालक, होमगार्ड
  • - के. पी. रघुवंशी - पोलीस महासंचालक, सिक्युरीटी
  • - सतीश माथूर - पोलीस आयुक्त, पुणे
  • - के. एल. प्रसाद - पोलीस आयुक्त, नवी मुंबई
  • - विजय कांबळे - पोलीस आयुक्त, मुंबई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2014 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close