S M L

सोलापूरच्या भारत हायस्कूलची तोडफोड

5 मार्च, सोलापूर सिद्धार्थ गोदाम सोलापुरातल्या भारत हायस्कूलची तोडफोड करण्यात आलीय. दहावीची परीक्षेचं हॉल टिकीट मुलांना भारत हायस्कूलनं दिलं नाही. परिणामी शाळेतल्या मुलांना परीक्षेपासून वंचित रहावं लागलंय. त्यामुळे संतप्त पालकांना शाळेची तोडफोड केली. भारत हायस्कूलची कोर्टात केस चालू होती. त्या केसचा निकाल काल शाळेच्या बाजूनं लागला नाही. त्यामुळे शाळेला हायकोर्टानं दहावीच्या मुलांच्या परीक्षेची हॉल तिकीट देणं नाकरलं. पण भारत हायस्कूलनं आपल्या शाळेतल्या 10 वीच्या परीक्षेला बसणा-या मुलांना आणि या मुलांच्या पालकांना हॉल तिकीट लवकरात लवकर मिळतील असं आश्वासन आठ दिवसांपूर्वी दिलं होतं. पण ऐन वेळी भारत हायस्कूलनं विद्यार्थ्यांना आणि पालकांना अंधारात ठेवलं. शाळेच्या गलथान कारभारामुळं 38 मुलांचं नुकसान झालं आहे. परिणामी संतप्त पालकांना भारत हायस्कूलची तोडफोड केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2009 11:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2009 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close