S M L

मोहम्मद रियाजला 5 वर्षांची शिक्षा

5 मार्च, मुंबई सुधाकर कांबळे 7/11च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी मोहम्मद रियाज याला 5 वर्षांची शिक्षा न्यायालयानं सुनावली. 24 वर्षांचा पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद रियाज नवाबद्दीन याला दहशतवाद विरोधी पथकच्या अधिका-यांनी 22 ऑगस्ट 2006 रोजी वडाळ्यातून अटक केली होती. यावेळी मोहम्मद रियाज याच्या केलेल्या झडतीत त्याच्याकडे दीड किलो आरडीक्स, 5 डिटोनेटर्स आणि 1 पिस्तुल सापडलं होतं. त्याच्या विरोधातला खटला शिवडी येथील न्यायधीश व्ही. बी. कामखेडकर यांच्या न्यायालयात सुरू होता. दोन वर्षांच्या सुनावणीत मोहम्मद रियाज याच्या विरोधात असलेल्या पुराव्याच्या अनुषंगानं न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं आणि आज शिक्षा सुनावली. न्यायालयानं मोहम्मद रियाज याला फॉरेनर्स ऍक्ट , आर्मस ऍक्ट, एक्सप्लोझिव्ह ऍक्ट या तीन कायद्यांखाली दोषी ठरवलंय. मोहम्मद रियाज हा फॉरनेर्स ऍक्ट कायद्या खाली दोषी ठरल्यानं त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आर्मस ऍक्ट खाली 1 वर्षांची शिक्षा आणि एक्सप्लोझिव्ह ऍक्ट खाली 5 वर्षांची शिक्षा सुनावली. गेल्या अनेक वर्षांत मुुंबईत अनेक बॉम्बस्फोट झालेत. या खटल्यातले अनेक पाकिस्तानी दहशतवादी फरार आहेत. मोहम्मद रियाज याला मात्र पोलिसांनी बॉम्बस्फोट करण्यापूर्वीच त्याला अटक केली होती. आणि त्याच्या विरोधातील खटला लवकरात लवकर चालवून आज शिक्षा झालीये. मोहम्मद रियाज नवाबद्दीन याला जेव्हा अटक करण्यात आली असता चौकशीत, आपला आणखी एक साथीदार मुंबईत आला असून त्याचं नाव मोहम्मद अली उर्फ ओसामा असं असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ए.टी.एस.नं ऍन्टॉपहील येथील सेक्टर 7 मध्ये कारवाई केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत मोहम्मद अली हा ठार झाला होता. यावेळी त्याच्याकडे एक एके- 47 रायफल आणि काही किलो आरडीएक्स सापडलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2009 11:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2009 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close