S M L

ब्रिटन : शिख समाजाने दिला निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

Sachin Salve | Updated On: Feb 17, 2014 10:40 PM IST

ब्रिटन : शिख समाजाने दिला निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

INDIA-RELIGION-SIKH17 फेब्रुवारी : 1984 मध्ये भारतात अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन 'ब्लू स्टार' बद्दल ब्रिटेनच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागणीसाठी ब्रिटन येथील शिख समाजाने आंदोलन पुकारले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान डेविड केमरन यांना शिख समाजाने पत्र लिहुन चौकशीची मागणी केलीय. जर आमची मागणी मान्य केली नाहीतर पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकात कंजरवेटीव पार्टीवर बहिष्कार टाकू असा इशारा ब्रिटेनच्या शिख फेडरेशनने दिलाय.

या प्रकरणाच्या स्वतंत्रपणे चौकशीसाठी पन्नासहुन अधिक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला असून ही संख्या आणखी वाढेल असा विश्वास फेडरेशनचे अध्यक्ष अमरीक सिंह यांनी व्यक्त केला. ब्रिटेनच्या शहरी भागात शिख समुदयाची संख्या सात लाख इतकी आहे. त्यामुळे आंदोलन जर चिघळले तर याचा परिणाम निवडणुकीच्या मतांवर दिसून येईल असं भाकित वर्तवलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2014 10:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close